माध्यम संक्षिप्त माहिती: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलाक नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण
प्रकाशन दिनांक: 16-07-2024

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कोलाक नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

कोलाक नदीवरील पुलाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • लांबी: १६० मीटर
  • यात ४ पूर्ण-विस्तार (Full Span) गर्डर्सचा समावेश आहे (प्रत्येकी ४० मीटर)
  • स्तंभांची (Piers) उंची – १४ मीटर ते २३ मीटर
  • ४ मीटर व्यासाचे गोलाकार स्तंभ (२ नग) आणि ५ मीटर व्यासाचे गोलाकार स्तंभ (३ नग)
  • हा पूल वापी आणि बिलिमोरा या बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान स्थित आहे. या दोन स्थानकांदरम्यान ज्या इतर नद्यांवरील पुलांचे काम पूर्ण झाले आहे, त्या म्हणजे औरंगा आणि पार नद्या.
  • या नदीचा उगम वाल्वेरी जवळील सापुतारा टेकड्यांमध्ये होतो आणि ती अरबी समुद्राला जाऊन मिळते.
  • कोलाक नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून ७ किलोमीटर आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे.



श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×