मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतीय अभियंते आणि कार्य-नेत्यांकरिता (Work Leaders) आणखी एक मार्गिका (Track) उभारणी प्रशिक्षण विभाग (Module) पूर्ण झाला आहे. हा २० दिवसांचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम 'स्लॅब ट्रॅक' (Slab Track) आणि 'सिमेंट डांबर मोर्टार' (CAM) च्या स्थापनेशी संबंधित होता.
सुरत येथे 'हाय-स्पीड रेल' मार्गिका उभारणी प्रशिक्षणासाठी खास उभारण्यात आलेल्या 'ट्रॅक प्रशिक्षण केंद्रा'मध्ये (Track Training Facility), या कार्यक्रमादरम्यान एकूण २० अभियंते, कार्य-नेते आणि तंत्रज्ञांना सहा जपानी तज्ञांद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. हा प्रशिक्षण विभाग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गिका उभारणीसाठीच्या १५ वेगवेगळ्या विभागांमध्ये (Modules), जपानी तज्ञ सुमारे १००० भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करतील आणि त्यांना प्रमाणित करतील.
This is an external link, Are you sure you want to Continue?