प्रकाशन दिनांक: Mon, 27/07/2026 - 17:32
भरूच बुलेट ट्रेन स्टेशन, भरूच येथील दहेज बायपास रोडवर स्थित आहे. स्टेशनची बाह्य रचना (फॅसाड) आणि डिझाईन पारंपरिक सुती विणकाम (कॉटन विव्हिंग) कलेपासून प्रेरित आहे.
स्टेशनवर प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा जसे की प्रतीक्षा कक्ष (वेटिंग लाउंज), बालसंगोपन कक्ष (नर्सरी), स्वच्छतागृह, रिटेल आऊटलेट्स इत्यादी उपलब्ध असणार आहेत. वेगवेगळ्या स्तरांदरम्यान सहज प्रवासासाठी लिफ्ट आणि एस्कलेटर बसवले जात आहेत. त्यांच्या डिझाईनमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या गरजांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्टेशन इमारतीजवळ कार, दुचाकी, ऑटो आणि बससाठी प्रवासी पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ व पार्किंगच्या सुविधेसह पादचाऱ्यांसाठी प्लाझा क्षेत्रही विकसित केले जाईल.
हे स्टेशन थेट राज्य महामार्ग-०६ (भरूच-दहेज महामार्ग) शी जोडलेले आहे. तसेच, हे मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेशी देखील सोयीस्करपणे जोडलेले आहे, जे स्टेशनपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन, भरूच रेल्वे स्टेशन, बुलेट ट्रेन स्टेशनपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर आहे.
स्टेशन इमारत
- ग्राउंड लेव्हल (भूस्तर)
- प्लॅटफॉर्म लेव्हल: दोन साईड प्लॅटफॉर्म
स्टेशनची प्रगती
रेल्वे आणि प्लॅटफॉर्म स्लॅब कास्टिंग, स्ट्रक्चरल स्टील इरेक्शन तसेच रूफ शीटिंगचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वास्तुशिल्पीय फिनिशिंगशी संबंधित कामे, जसे की फॅसाडचे बांधकाम, प्लॅटफॉर्म फ्लोअरिंग तसेच इतर फिनिशिंगची कामे प्रगतीपथावर आहेत.
संबंधित प्रतिमा