बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमध्ये NH-48 वर उभारल्या जाणाऱ्या, २ x १०० मीटर लांबीच्या पोलादी पुलाचा पहिला १०० मीटरचा गाळा (Span) कार्यान्वित करण्यात आला.
प्रकाशन दिनांक: 26-04-2025

गुजरातमध्ये नाडियादजवळ, NH-48 (जो दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला जोडतो) वरून जाणाऱ्या २ X १०० मीटर लांबीच्या पोलादी पुलाचा पहिला १०० मीटरचा गाळा (span) यशस्वीरित्या उभारण्यात आला.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या पोलादी पुलामध्ये १०० मीटर लांबीचे दोन गाळे आहेत. बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी NH-48 ओलांडण्याकरिता या पुलाचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी एक गाळा यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे.

NH-48 हा सहा मार्गिका असलेला (प्रत्येक बाजूला तीन मार्गिका) देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. पुलाचा पहिला गाळा एका टोकाकडून सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत सरकवून, महामार्गावरील तीन मार्गिकांच्या (लेन्सच्या) वरून यशस्वीरित्या उभारण्यात आला. या व्यस्त महामार्गावर वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहावा आणि रस्ते वापरकर्त्यांना होणारा व्यत्यय कमीत कमी असावा, या उद्देशाने एका विशिष्ट वेळापत्रकानुसार ही उभारणी प्रक्रिया पार पाडण्यात आली.

या पोलादी पुलाचा १०० मीटर लांबीचा गाळा, ज्याची उंची अंदाजे १४.६ मीटर आणि रुंदी १४.३ मीटर आहे, त्याचे वजन सुमारे १४१४ मेट्रिक टन इतके आहे. उत्तर प्रदेशातील हापूरजवळ असलेल्या सालासार येथील कार्यशाळेत निर्मिती करण्यात आलेले हे पोलादी पूल १०० वर्षांचे आयुर्मान लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत.

या पुलाच्या बांधकामात सुमारे ५७,२०० ‘टॉर-शिअर टाइप हाय स्ट्रेंथ’ (TTHS) बोल्ट्स, C5 प्रणालीचे रंगकाम (painting) आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्जचा वापर करण्यात आला आहे. जमिनीपासून १४.९ मीटर उंचीवर असलेल्या तात्पुरत्या आधारस्तंभांवर (trestles) या पुलाची जोडणी करण्यात आली होती. त्यानंतर, प्रत्येकी २५० टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या दोन अर्ध-स्वयंचलित जॅक्सचा आणि ‘मॅक-अलॉय’ बार्सचा वापर करून एका स्वयंचलित यंत्रणेद्वारे हा पूल पुढे सरकवण्यात आला.

संपूर्ण कॉरिडॉरसाठी एकूण २८ पोलादी पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ११ पोलादी पूल महाराष्ट्रात, तर १७ पूल गुजरातमध्ये आहेत. गुजरातमध्ये रेल्वे/DFCC मार्गिका, महामार्ग आणि भिलोसा इंडस्ट्रीच्या वरून जाणाऱ्या सात पोलादी पुलांची उभारणी आतापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.


संबंधित छायाचित्रे



गुजरातमधील एनएच - 48 वर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 2x100 मीटर लांब स्टील पुलाचे पहिला 100 मीटर स्पॅन लाँच केला
गुजरातमधील एनएच - 48 वर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 2x100 मीटर लांब स्टील पुलाचे पहिला 100 मीटर स्पॅन लाँच केला
गुजरातमधील एनएच - 48 वर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 2x100 मीटर लांब स्टील पुलाचे पहिला 100 मीटर स्पॅन लाँच केला

श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×