माध्यम संक्षिप्त माहिती: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, नवसारी येथे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर २६० मीटर लांबीचा PSC पूल पूर्ण करण्यात आला आहे.
प्रकाशन दिनांक: 20-08-2024
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका, गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अमदपूर गावापाशी, दिल्ली आणि चेन्नई दरम्यानच्या (गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या) राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून एका उन्नत पुलाद्वारे (Elevated Viaduct) ओलांडून जाते.
  • २६० मीटर लांबीचा हा पूल म्हणजे, SBS (Span by Span) पद्धतीचा वापर करून महामार्गावर पूर्ण करण्यात आलेला पहिला 'PSC बॅलन्स्ड कँटिलिव्हर' (PSC Balanced Cantilever) पूल आहे.
  • या पुलामध्ये १०४ विभागांचा (Segments) समावेश असून, तो ५० मी. + ८० मी. + ८० मी. + ५० मी. या रचनेनुसार असलेल्या चार 'स्पॅन्स'नी (Spans) बनलेला आहे.
  • हा पूल सुरत आणि बिलिमोरा या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग ४८ हा देशातील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असल्याने, या महामार्गावरून पुलाचे बांधकाम (Launching) अत्यंत काटेकोर नियोजनासह आणि अचूक अंमलबजावणीद्वारे पूर्ण करण्यात आले.



श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×