NHSRCL ने मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी वांद्रे कुर्ला संकुल (BKC) HSR स्थानकाच्या रचना आणि बांधकामाकरिता आर्थिक निविदा उघडल्या
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने MAHSR C-1 पॅकेज अंतर्गत, मुंबई (महाराष्ट्र) येथील वांद्रे कुर्ला संकुल (BKC) हाय स्पीड रेल स्थानकाच्या रचना आणि बांधकामासाठीच्या आर्थिक निविदा उघडल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या ३ (तीन) निविदाकारांच्या आर्थिक निविदा आज उघडण्यात आल्या; यामध्ये मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांच्या संयुक्त उपक्रमाने (मे. MEIL-HCC संयुक्त उपक्रम) सर्वात कमी दराची निविदा सादर केली आहे.
या निविदेच्या तांत्रिक निविदा ४ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडण्यात आल्या होत्या.
This is an external link, Are you sure you want to Continue?