निवेदन: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (TBM) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
प्रकाशन दिनांक: Sun, 05/07/2026 - 00:00

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत पहिले टनल बोरिंग मशीन (TBM) आज विक्रोळी शाफ्टमधून भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात करत असून ते बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने पुढे सरकेल.

एकूण 21 कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी 16 कि.मी. लांबीचा सावली (घणसोली) ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यानचा भाग टनल बोरिंग मशीनद्वारे बांधला जाणार आहे. उर्वरित 5 कि.मी. लांबीचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने (NATM) यापूर्वीच पूर्ण करण्यात आला आहे.

विक्रोळी येथून सुरू करण्यात आलेले हे TBM सुमारे 6 कि.मी. लांबीचा सिंगल-ट्यूब बोगदा खोदणार असून त्यामध्ये बुलेट ट्रेनसाठी अप आणि डाउन दोन्ही मार्गांचा समावेश असेल. आपल्या प्रवासादरम्यान हे मशीन बहुमजली इमारती, रस्ते, मिठी नदी तसेच इतर महत्त्वाच्या नागरी पायाभूत सुविधांच्या खालीून मार्गक्रमण करेल.

रेल्वे बोगदा बांधकामासाठी भारतात वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या मशीनपैकी हे एक आहे. याच्या कटरहेडचा व्यास 13.6 मीटर असून तो चार मजली इमारतीच्या उंचीइतका आहे. या मशीनचे वजन सुमारे 3,100 टन असून ते जवळपास 500 आशियाई हत्तींच्या वजनाइतके आहे. याची एकूण लांबी 96 मीटर असून ती जवळपास एका फुटबॉल मैदानाच्या लांबीइतकी आहे.

या मशीनमध्ये कटर व्हील/हेड, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शिल्ड, टेल शिल्ड तसेच बोगदा खोदकामासाठी सहाय्य करणाऱ्या चार विशेष गॅन्ट्री अशा प्रमुख घटकांचा समावेश आहे.

या मशीनचे कटर व्हील 4 RPM (प्रति मिनिट 4 प्रदक्षिणा) या वेगाने फिरते.

या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे मशीन मिक्सशील्ड TBM (Mixshield TBM) असून ते अत्याधुनिक स्लरी-आधारित टनेलिंग प्रणाली आहे. मिश्र भूपृष्ठीय परिस्थिती आणि उच्च भूजलदाब असलेल्या भागांमध्ये मोठ्या व्यासाचे बोगदे बांधण्यासाठी ही प्रणाली विशेषतः विकसित करण्यात आली आहे.

मिक्सशील्ड तंत्रज्ञानामध्ये दाबयुक्त बेंटोनाइट स्लरीचा वापर करून खोदकामादरम्यान बोगद्याचा पुढील भाग स्थिर ठेवला जातो. गुंतागुंतीच्या भूवैज्ञानिक परिस्थितीत आणि दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित व प्रभावी बोगदा बांधकामासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे.

मुंबई उपनगरीय विभागासाठी या तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे कारण ते जमिनीच्या खचण्यावर प्रभावी नियंत्रण ठेवते आणि पृष्ठभागावरील अडथळे कमीत कमी ठेवते.

या TBM चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते बोगद्याचे खोदकाम आणि प्रीकास्ट काँक्रीट सेगमेंट रिंगची उभारणी एकाच वेळी करते. त्यामुळे बांधकाम अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम होते.

TBM सुरू करण्यासाठी विक्रोळी येथे 56 मीटर खोल शाफ्ट बांधण्यात आला आहे, जो जमिनीखालील सुमारे 20 मजली इमारतीइतका खोल आहे.

या शाफ्ट परिसरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट, स्लरी ट्रीटमेंट प्लांट, बेंटोनाइट स्टोरेज टाक्या, समर्पित वीज उपकेंद्र, बॅकअप जनरेटर संच, ग्राउटिंगसाठी रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट, स्लरी ट्रान्सपोर्ट प्रणाली, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, बॅकअप गॅन्ट्री तसेच इतर आवश्यक लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सुरक्षित बोगदा बांधकाम आणि आसपासच्या संरचनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. यामध्ये Surface Settlement Points (SSP), Optical Displacement Sensors (ODS)/Tilt Meters, Bi-Reflective Targets (BRT/3D Targets), Strain Gauges आणि Seismographs यांसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील महापे येथे 11.17 हेक्टर क्षेत्रात उभारलेल्या विशेष कास्टिंग यार्डमध्ये 16 कि.मी. TBM बोगद्यासाठी आवश्यक टनेल लाइनिंग सेगमेंटचे उत्पादन सुरू आहे.

या प्रकल्पासाठी एकूण 77,000 काँक्रीट सेगमेंट तयार करण्यात येत असून त्यापासून 7,700 टनेल रिंग तयार केल्या जातील. प्रत्येक रिंगमध्ये 9 वक्र सेगमेंट आणि 1 की-सेगमेंट असतो. प्रत्येक सेगमेंट 2 मीटर रुंद आणि 500 मिमी जाडीचा असून एका पूर्ण रिंगचे वजन सुमारे 100 टन आहे.

TBM द्वारे तयार होणारा बोगदा पूर्णपणे जलरोधक (Waterproof) स्वरूपात विकसित केला जात आहे. तसेच संरचनात्मक कार्यक्षमता, भूजलाचे वर्तन आणि बांधकाम सुरक्षिततेसाठी सातत्याने रिअल-टाइम मॉनिटरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

बोगद्यात पाण्याची गळती रोखण्यासाठी टनेल लाइनिंगमध्ये डबल-लेयर EPDM (Ethylene Propylene Diene Monomer) गॅस्केट आणि हायड्रोफिलिक सील वापरण्यात येत आहेत, ज्यामुळे बोगद्याची दीर्घकालीन मजबुती, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होईल.


संबंधित प्रतिमा



मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, भारतातील सर्वात मोठी 'रेल बोगदा खोदणारी यंत्रणा' (Rail Tunnel Boring Machine) विक्रोळी येथून खोदकाम सुरू करणार आहे.

श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×