बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांवर ‘प्रयास’ (Prayas) या संवादी पथनाट्यांच्या मालिकेचा प्रारंभ झाला आहे.
प्रकाशन दिनांक: 19-08-2025

बांधकाम स्थळांवरील सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि तिच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करण्यासाठी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधकाम स्थळापासून संवादी 'नुक्कड नाटकांची' (पथनाट्यांची) एक मालिका सुरू करण्यात आली. या मार्गावरील (कॉरिडॉरवरील) एकूण ४० बांधकाम स्थळांचा (२९ गुजरातमध्ये आणि ११ महाराष्ट्रात) यात समावेश करण्यात आला आहे.

या नुक्कड नाटकांमध्ये सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे; जसे की उंचावर काम करणे, अवजड यंत्रसामग्रीच्या परिसरात व सानिध्यात काम करणे, रस्ते आणि रेल्वेमार्गांजवळ काम करणे, तसेच कामावर असताना मोबाईल फोनचा वापर टाळणे. ही नाटके कामगारांना सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देण्यास जोरदारपणे प्रोत्साहित करतात.

बुलेट ट्रेन बांधकाम स्थळांवरील कामगार देशाच्या विविध भागांतून आलेले असून ते वेगवेगळ्या भाषा आणि बोलीभाषा बोलतात; त्यामुळे प्रभावी संवाद साधला जावा या उद्देशाने, ही नाटके साध्या, स्पष्ट आणि सहज समजेल अशा भाषेत सादर केली जातात.

या मोहिमेअंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनची अनेक निर्माणाधीन स्थानके, कास्टिंग यार्ड्स, बोगद्यांच्या बांधकामाची ठिकाणे, डेपो, पूल आणि उड्डाणपूल (viaducts) यांचा समावेश केला जाईल.

यापूर्वी, NHSRCL ने १०० नुक्कड नाटकांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये १५,००० हून अधिक बांधकाम कामगारांनी सहभाग घेतला होता.

बुलेट ट्रेनची सर्व बांधकाम स्थळे प्रत्येकासाठी सुरक्षित कामाची ठिकाणे असतील, याची खात्री करण्यासाठी NHSRCL कटिबद्ध आहे. ही नुक्कड नाटके त्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.


संबंधित प्रतिमा



18 ऑगस्ट 2025 रोजी बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांवर 'प्रयास' उपक्रमांतर्गत संवादात्मक पथनाट्य सादर करण्यात आले
18 ऑगस्ट 2025 रोजी बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांवर 'प्रयास' उपक्रमांतर्गत संवादात्मक पथनाट्य सादर करण्यात आले
18 ऑगस्ट 2025 रोजी बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांवर 'प्रयास' उपक्रमांतर्गत संवादात्मक पथनाट्य सादर करण्यात आले
18 ऑगस्ट 2025 रोजी बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांवर 'प्रयास' उपक्रमांतर्गत संवादात्मक पथनाट्य सादर करण्यात आले

श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×