प्रकाशन दिनांक: Tue, 08/07/2025 - 00:00
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील दमनगंगा नदीवरील पुलाचे काम मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये नियोजित असलेल्या २१ नदी पुलांपैकी पूर्ण झालेला हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात स्थित असलेले सर्व पाच (०५) नदी पूल आता पूर्ण झाले आहेत. एकूणच, संपूर्ण मार्गिकेवर (कॉरिडॉरवर) २५ नदी पुलांचे बांधकाम सुरू आहे.
वलसाड जिल्ह्यातील MAHSR (मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल) मार्गिका अंदाजे ५६ किमी लांबीची आहे (यात दादरा आणि नगर हवेलीमधील ४.३ किमीचा समावेश आहे); ही मार्गिका झरोली गावापासून सुरू होऊन वाघलधरा गावापाशी संपते. या मार्गिकेत वापी बुलेट ट्रेन स्थानक, ३५० मीटर लांबीचा बोगदा, ०५ नदी पूल आणि ०१ PSC पूल (२१० मीटर) यांचा समावेश आहे.
या नदी पुलाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- लांबी: ३६० मीटर
- यात ९ 'फुल स्पॅन गर्डर्स'चा (प्रत्येकी ४० मीटर) समावेश आहे
- स्तंभांची (Piers) उंची: १९ मीटर ते २९ मीटर
- ४ मीटर व्यासाचा एक वर्तुळाकार स्तंभ, ५ मीटर व्यासाचा एक स्तंभ आणि ५.५ मीटर व्यासाचे ८ स्तंभ
- बोईसर आणि वापी या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित
- या दोन स्थानकांदरम्यान पूर्ण झालेला आणखी एक नदी पूल म्हणजे 'दरोठा नदी पूल'
- वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून अंदाजे १ किमी अंतरावर आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकापासून ६१ किमी अंतरावर स्थित
वलसाड जिल्ह्यात पूर्ण झालेल्या इतर नदी पुलांमध्ये औरंगा (३२० मीटर), पार (३२० मीटर), कोळक (१६० मीटर) आणि दरोठा (८० मीटर) यांचा समावेश आहे.
अतिरिक्त माहिती:
दमनगंगा नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वालवेरी गावाजवळील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होतो.
ही नदी महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली, तसेच दमण या प्रदेशांतून सुमारे १३१ किलोमीटर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. ही नदी पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वापी, दादरा आणि सिल्वासा यांसारखी औद्योगिक शहरे या नदीच्या काठावर वसलेली आहेत. या नदीवर बांधलेले 'मधुबन धरण' हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे; ज्यामुळे गुजरात, दादरा आणि नगर हवेली (DNH), तसेच दमण आणि दीव या प्रदेशांना लाभ होतो. हे धरण सिंचन, पाणीपुरवठा आणि वीजनिर्मितीसाठी पाणी उपलब्ध करून देते.
संबंधित प्रतिमा