मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू झाले असून, गुजरातमध्ये सुरत आणि बिलिमोरा या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान, जमिनीच्या पातळीपासून १४ मीटर उंचीवर असलेल्या व्हायाडक्टवर (उन्नत मार्गावर) पहिले दोन पोलादी खांब उभारण्यात आले आहेत.
या संपूर्ण मार्गिकेवर एकूण २०,००० हून अधिक खांब उभारले जातील, ज्यांची उंची ९.५ ते १४.५ मीटर दरम्यान असेल. हे खांब 'ओव्हरहेड इक्विपमेंट' (OHE) प्रणालीला आधार देतील; या प्रणालीमध्ये ओव्हरहेड तारा, अर्थिंग व्यवस्था, विविध फिटिंग्ज आणि संबंधित उपकरणांचा समावेश आहे. अशा प्रकारे, हे खांब MAHSR मार्गिकेसाठी बुलेट ट्रेन चालवण्यास योग्य अशी संपूर्ण '२x२५ kV ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली' तयार करतील.
'मेक इन इंडिया' धोरणाला चालना देत, जपानी मानक रचना आणि निकषांनुसार तयार करण्यात आलेले हे OHE खांब भारतातच उत्पादित करण्यात आले आहेत. हे खांबच या उच्च-वेगवान रेल्वेगाड्यांच्या ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीला आधार देण्याचे कार्य करतील.
This is an external link, Are you sure you want to Continue?