माध्यम संक्षिप्त माहिती: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कावेरी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण
प्रकाशन दिनांक: 05-09-2024
गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या २० नदी पुलांपैकी पूर्ण झालेला हा ११ वा नदी पूल आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी, गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील कावेरी नदीवरील पुलाचे बांधकाम २५ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

या पुलाची ठळक वैशिष्ट्ये:

  • लांबी: १२० मीटर
  • यात ३ पूर्ण-स्पॅन गर्डर्सचा (प्रत्येकी ४० मीटर) समावेश आहे.
  • स्तंभांची (Piers) उंची – १३ ते २१ मीटर
  • ४ मीटर व्यासाचा एक (०१) वर्तुळाकार स्तंभ आणि ५ मीटर व्यासाचे तीन (०३) वर्तुळाकार स्तंभ.
  • हा पूल वापी आणि बिलिमोरा या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित आहे. या दोन स्थानकांदरम्यान पूर्ण झालेले इतर नदी पूल कोलाक, पार आणि औरंगा नद्यांवर आहेत.
  • ही नदी अंबिका नदीची एक उपनदी आहे; अंबिका नदीचा उगम गुजरात राज्याच्या महाराष्ट्र सीमेलगतच्या, वांसदा तालुक्याच्या डोंगराळ भागात होतो.
  • कावेरी नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून अंदाजे ४६ किमी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून ४ किमी अंतरावर आहे.

पूर्ण झालेल्या इतर नदी पुलांमध्ये यांचा समावेश आहे:

पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंढोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा), वेंगानिया (नवसारी जिल्हा), मोहर (खेडा जिल्हा), ढाढर (वडोदरा जिल्हा), कोलाक नदी (वलसाड जिल्हा) आणि वात्रक नदी (खेडा जिल्हा).




श्रीमती सुषमा गौर
महाव्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: gm.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्री. निशांक भानु
वरिष्ठ व्यवस्थापक,
विपणन आणि संवाद
ईमेल: mgr.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
श्रीमती पूजा सिंह
सहाय्यक व्यवस्थापक,
जनसंपर्क
ईमेल: am1.pr@nhsrcl.in
फोन: 011-26700000/01
×