नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ची स्थापना 12 फेब्रुवारी 2016 रोजी 2013 च्या कंपनी कायद्याखाली भारतामध्ये हाय स्पीड रेल मार्गासाठी वित्त पुरवठा, बांथकाम, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने करण्यात आली होती. ही कंपनी संयुक्त क्षेत्रामध्ये ‘स्पेशल पर्पज व्हीकल’ म्हणून आदर्श असून रेल्वे मंत्रालयाद्वारे केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकार अनु. गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा त्यात भांडवली सहभाग आहे.
हाय-स्पीड रेल (HSR) प्रकल्प एक तंत्रशास्त्रीय चमत्कार आहे, तसेच त्याचे अनेक गणनयोग्य लाभ देखील आहेत जसे प्रवास वेळेतील बचत, वाहन चालविण्याचा खर्च, प्रदूषण कपात, रोजगार निर्मिती, अपघातांमध्ये घट/वाढीव सुरक्षा, आयाती इंधनाला पर्याय, आणि प्रदूषकांमध्ये कपात. या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा देखील वाढतील आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धित भर पडेल. HSR ही एक समन्वित यंत्रणा असेल त्यामध्ये विविध घटकांचा एकंदरीत अधिकतम वापर केलेला असेल, अनु. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ह्युमन-वेअर, आणि त्यांचा इंटरफेस, इ.
कंपनीला हाय-स्पीड कॉरिडॉरचे संचालन करण्यासाठी सुमारे 3000 – 4000 कर्मचारी (अंदाजित) असे मनुष्यबळ लागेल. हे आवश्यक मनुष्यबळ हाय-स्पीड तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये अतिशय कार्यक्षम असले पाहिजे जेणेकरुन हा प्रकल्प कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करता येईल. म्हणून, कंपनीने या दृष्टिने सोयीचे म्हणून वडोदरा इथे एक विशेष प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.
कंपनी हाय स्पीड रेल्वे सिस्टीमचा वापर करुन जगातील मोजक्या देशांच्या (सुमारे 15) पंक्तीत भारताला स्थापित करेल.