कौशल्य संच सुधारण्यासाठी आणि मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त लोकांच्या कुटुंबांसाठी उत्पन्न निर्मितीच्या संधी निर्माण करण्यासाठी, एनएचएसआरसीएल आय पुनर्स्थापना कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे.
ठाणे जिल्ह्यातील गावांतील 14 उमेदवारांच्या पहिल्या तुकडीने हॉटेल व्यवस्थापनामध्ये त्यांचे वर्ग प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता ते मुंबईच्या अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांचे 'ऑन द जॉब ट्रेनिंग' करणार आहेत. वर्ग प्रशिक्षणादरम्यान, सहभागींनी यात कौशल्य प्राप्त केले आहे: अन्न उत्पादन, अन्न आणि पेय सेवा, घरकाम, संवाद आणि अग्र कार्यालय.
प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षण व विकास कार्यक्रम परिषद प्रा. लि., ठाणे, महाराष्ट्रातील सरकारी मान्यताप्राप्त संस्थेने आयोजित केला होता.
सहभागींशी अंकीय संवाद साधताना, एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक, श्री अचल खरे म्हणाले, "भारत हा एक तरुण देश आहे आणि आपल्या तरुणांनी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून ते आत्मनिर्भर बनू शकतील आणि राष्ट्र उभारणीत देखील योगदान देऊ शकतील. एनएचएसआरसीएल विविध विषयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आणि तरुण मनाला त्यांच्या रोजगाराच्या संधी सुधारण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.
आतापर्यंत 239 हून अधिक सहभागींना संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग, संगणकीय पुस्तपालन, सांधकाम आणि संविरचना, मोबाईल दुरुस्ती, विद्युत कामे, कार्यालय स्वयंचलन इ. विविध कौशल्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सध्या, एनएचएसआरसीएल गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये बांधकामाशी संबंधित कामे जसे कि बार वाकवीणे, बांधकाम विद्युत कामे, प्लंबिंग, पटलेपन इ. साठी आवश्यक असलेल्या मोफत प्रशिक्षणाची सोय करत आहे.